Research म्हणजे प्रसंगांची chronological मांडणी, वंशवृक्ष आणि नातीगोती ह्यांचे शाॅर्ट नोट्स इतकंच?
प्रसंगांची मांडणी करतांना थोडी common sense दाखवावी ना!!
१) अकबरला आणि अख्ख्या दरबाराला भर गोंगाटात जोधाच्या अंत:पुरातलं भजन ऐकू येतं आणि आपला हीरो चक्क दरबार सोडून आतमध्ये येतो! दोनतीन बुरूज आणि तटबंद्यांपलिकडेही ऐकू यायला त्याकाळी तंत्रज्ञान पुढारलेलं नसल्याने एव्हढ्या अंतरावर तयार गळ्यातून निघालेली अज़ानच ऐकू जाईल असं वाटतं.

जोधाच्या फुफ्फुसांत इतकी ताकत भलेही असो- इतक्या volume चं भजन गातांना तिच्या गळ्याच्या-कपाळाच्या शिरा अगदी नॉर्मल?!
२) राणी म्हणून चांगली असो, पण 'जोधा बच्चन' स्वयंपाकीण म्हणून उधळी दिसतेय. बावर्चीखान्यात भाज्यांचा ढीग पाहून मॅडम गावजेवण घालतील असं वाटलं, पण तितकं अन्न आणि इला अरुणचं रक्त आटवून ती फक्त सात-आठ पातेली रांधून घेऊन आली?!

वरून अकबरला म्हणते- "उसे मत खाईये!! "(ढॅण्टढॅण!!)
"उसमें नमक कम है!!" (सतारीची लकेर आणि हास्यकल्लोळ!!)
"उसमें नमक कम है!!" (सतारीची लकेर आणि हास्यकल्लोळ!!)
(आमच्यात वाढायच्या आधीच हे तपासून घेतात बरं! )
३) ज्या काळात नवरे लढाईला गेल्यावर बायका पडद्यांआड जोहाराची तयारी करून बसत, तिथे जोधाराणी घोड्यावर बसून रणांगणावर आलेल्या दाखवल्याय्त!
४) समशेरीचा रियाज़ करतांना बिनचिलखताची माणसं लोखंडी समशेर चालवतात- यह बात हज़म नहीं हुई!
५) पाचसहाशे माणसांना 'अज़ीम्-ओ-शान शहनशाह' ह्या ओळी एकाच यमकात एकाच वेळी सुचतात हेही विनोदी वाटतं खरं- गाण्याचे शब्द त्याला पार्श्वसंगीताच्या category साठी योग्य ठरवतात- 'जश्न्-ए-बहारा' आणि इन 'लमहों के दामन में'- ही गाणी पण तर अशीच वापरलीत ना? पार्श्वसंगीतासारखी?
Gowariker! You too? 'स्वदेस' किंवा 'लगानच्या' काल्पनिक पात्रांना हे ट्रीटमेंट ठीक आहे, पण ऐतिहासिक पात्रांनी काय हत्तीघोडी मारलीत?
नितिन देसाई, किरण देवहंस आणि तनिष्कच्या सुवर्णकारांना टाळ्या!!
ऋतिकचा अभिनय बरा जमलाय, ash did best possible justice to her role - तसंही ही मंडळी काहीही (नाही) नेसलं तरी देखणी वाटतात्- कास्टिंग फ़ूलप्रूफ़्- UTV चा खर्च (बहुतेक) वसूल... अजून काय हवंय?

6) अजून एक चमत्कार!! 'ख़्वाजा मेरे ख़्वाजा' मध्ये हार्मोनियम ऐकू येतो. मात्र हार्मोनियम १९व्या शतकात भारतात आला.
नौशादजींनी मुघल्-ए-आज़म मघ्ये असला काही लोच्या नाही होऊ दिला.
B&W चित्रपट होता तरीही के. आसिफ़ने रंगांच्या निवडीत आळस नाही केला हे चित्रपट रंगवल्यानंतर सिद्ध झालं! आपली पिढी कुठल्या रीसर्च च्या गोष्टी करते?

----
हे आधी लिहायला आवडलं असतं, पण first day-first show जाता यावं अशी सवड नाही, आणि परीक्षणं लिहायचा पगार नसल्याने आपण त्या भानगडीत कधी पडत नाही. (तसंही हे परीक्षणाच्या व्याख्येत बसत नाही)
(इतकं असूनही) चित्रपटाला ३.५ तारे. (डोळ्यांसमोर बरेच!!)
7 comments:
haha :)
आपले परिक्शन फ़ारच छान आहे.
:D
azimoshan ani bhajanacha prasang malahi khup khatakala...
pan ashutosh gowarikarachya "kala-swatantra"chya navakhali sodun dilya!
pan baki Itihas na baghta film pahilyawar.. film changali watali!
harmonium mazya lakshatch ala nahi, kadachit te ganach itaka dokyat gele hota, tyamule asel!
हेहेहे! धमाल आहे. मी इतकी वाहवत गेले होते इतर बर्याच चांगल्या गोष्टींत, की हे सगळं बघितलं, पण मेंदूनं नोंद नाही घेतली!
govarikar cha bhansali-johar hoil kahi varshat.. :)
pan tumhi chitrapaat pahayla gela hotat ki samiksha karayla? :)
mala tar aishwarya shivay kahi disena.. :)
-x-curse
दामल्या सहि है!
असच एक किस्सा जे.पी. दत्ता यांच्या "बॉर्डर" चित्रपटा बाबत.
तुला आठवत असेल तर सुनिल शेट्टीचा "अखेरचा" शॉट आठव. तो जखमी होऊन पडलेला असतो. तेव्हा त्याला कोपर्यातला "ऍन्टी-टॅंक माईन" दिसतो. साहेब तसेच उठतात, तो उचलतात आणि चालु पडतात. त्याला अपल्याकडे येताना बघुन टॅंक वरचा ऑफिसर आपल्या गनर्सना त्याच्यावर गोळ्या चालवायला सांगतो. अख्या युद्धात जितक्या गोळ्या चालवल्या नसतील तितक्या गोळ्या एकट्या सुनिल शेट्टीवर चालवुन त्याची चाळण करतात. सुनिल रींगा-रींगा-रोली करत टॅंकच्या सम्मोर येउन नमाज पढल्या सारखा झोपतो. मग अचानक ’मां शक्ती" त्यावर प्रसन्न होते आणि तो अचानक लाळेची नदी वाहत उभा राहतो. हां!!! इथे खरी मजा आहे. त्याच्या हातातला "ऍन्टी-टॅंक माईन" बघुन तो ऑफिसर घाबरतो आणि केकाटतो "अरे! इसके हाथ मैं तो "ऍन्टी-टॅंक माईन" है! टॅंक पिछे लो! टॅंक पिछे लो!! पिछे लो टॅंक!!! " आता मला सांगा "ऍन्टी-टॅंक माईन" वरती जोवर टॅंकचे पुर्ण वजन पडत नाहि तोवर घाबरायचे काय कारण? अरे शिंच्या मग रहा कि जागेवर उभा. अजुन हजार भर गोळ्या घाल सुनिलला अणी मग मेला कि "ऍन्टी-टॅंक माईन" घे काढुन उगीच काय उभा असलेला टॅंक हलवयचा मागे? प्रेक्षक काय इतके मुर्ख वाटले????????????
मस्त! परीक्षण आवडले. :)
Post a Comment