Sunday, December 13, 2009

'शब्देविण संवादू, दुजेविण अनुवादू!'

मित्रहो,

ब्लॉगचं डबकं करून ठेवल्याबद्दल मंडळ दिलगीर आहे (शेवटी ब्लॉग हा आपल्या मेंदूचा प्रातिनिधिक तुकडाच की हो! आता मेंदू 'डब(कं)घाई'ला पोचल्याबद्दल मी स्वत:चाही दिलगीर आहे)

पत्रकारितेतल्या आयुष्यात स्वत:पुरती उत्स्फूर्तता आटते आणि स्वत:पुरते शब्दही. सगळे अनुभव नुसते रिचवतो. वर्णन जमेनासं झालंय म्हणून आता प्रयत्न डोळ्यांवाटेच बोलायचा.

इथे काही मित्र तुमच्या भेटीस आणत आहे. प्रस्तुत जमात ही बालपणापासून मित्र झालीय. ह्या मित्रांची भाषा येत नसली तरी कळते हे आमच्या 'संवादावरून' कळेलच! :)ह्याच पशुरुग्णालयात दत्तक घेतलेलं हे 'मूल'. साहेब पिसासारखे हलके असले तरी ह्या खांद्यांना, त्याच्या विश्वासाचं वजन जाणवत होतं. त्याच्या पिंजर्‍यात लालभाई माकडं पण होती. रंगभेदाचा बळी, घाबरलेला, उकाड्याने हैराण- माझ्या फुंकरीची मजा अनुभवणारा, भीति असह्य होऊन बिलगणारा- हा काळू. 'मूल' अशासाठी की 'हा माझ्यावर गेलाय' असा अभिप्राय ९०% मित्रांनी दिला आहे! :)असा हा 'शब्देविण संवादू' आमचे कॅमेरामन नितिन अहिरे ह्यांनी टिपलाय. मानवी कलकलाटापेक्षा कधीकधी ह्या गप्पा खूप थंडावून जातात! :)

सस्नेह,
योगेश