Your password will expire in 15 days. Do you want to change it now?
च्यायला!! थट्टा आहे की काय? पंधरा दिवसांपूर्वीच तर बदलला होता!! आतापासून कशाला डोक्याला हा भुंगा?
छे... करू देत त्यांना प्रॉम्प्ट... आपण नाही बदलायचा! अरे!! ऑफ़िसचं टपाल वाचायचं की नवनवे पासवर्ड्स शोधत बसायचे?
हेहे... सगळ्यांच्याच कपाळावर आठ्या आहेत... नवीन पासवर्ड्स ठरवतांना मेंदू मुरगळतोच सगळ्यांचा... फोन नंबर, गावाचं नाव, आवडती शिवी, तमाम आजी-माजी-प्रियकर-प्रेयसींची नावं, आवडत्या रागांचे आरोह-अवरोह, कुत्र्यांची नावं, आवडत्या बुलेटिन्सची नावं, शिवाय ह्या सगळ्यांच्या स्पेलिंग्स चे उलट-सुलट कॉंम्बिनेशन- हुश्श... सगळ्यांचं सगळं वापरून झालंय... आता सगळेच कुठेतरी वैतागलेलेत...
पण लेकाहो, (सॉरी. लोकहो) पासवर्ड संपायची तारीख म्हणजे महिनाअखेर... "तीन दिवसांत पासवर्ड गचकणार" च्या ऐवजी "तीन दिवसात तुमचा पगार होणार!! उगी उगी!!" असं का नाही वाचून पाहत कुणी? :)
कदाचित हा माझाच puppy dog दृष्टिकोन. संसारी एडिटर्सना महिन्याचे चार आठवडे अनुक्रमे गोल्डन वीक, सिल्वर वीक, ब्रॉन्ज़ वीक आणि 'रद्दी वीक'! :D
Saturday, July 28, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
वाटकच होतं तुझच असणार हे लिखाण म्हणुन :)
गोल्डन वीक, सिल्वर वीक, ब्रॉन्ज़ वीक आणि 'रद्दी वीक'!>>>>अगदी अगदी पण इथे रद्दीपण नसते :D
aawadati shiwi???!!! Jabarat idea ahe! Aata mi waparin!!! Attaparyant kadhi suchlach nawhat.... Thanks!
नाही!! ह्या 'रद्दी वीक' चा उगम त्या काळातला आहे जेव्हां माझा वॉर्डरोब वीसपंचवीस लंगोट आणि चार कुंच्या ह्यांनी सज्ज होता. आज खूप वर्षांनी आठवला इतकंच!! :D
tujhi post vachtana majhya eka junya postchi athavan jhali. Malahi agadai asach vaitag yeto pwd change karaycha. :-) Btw, more frequent and longer blogs make us all happy. ;-)
(http://vidyabhutkar.blogspot.com/2006/09/blog-post_27.html)
-Vidya.
Post a Comment