'रात्र-रात्र घराबाहेर' ची कल्पना गमतीशीर जरी वाटत असली, तरीही शेवटेशेवटी तेही अंगावर येऊ लागतं!
येत्या आठवड्यापासून दुपारच्या शिफ़्ट च्या कल्पनेची भुरळ पडते, आणि योगेश कामाला लागतो.
सहाचं बुलेटिन रात्री अडीच-तीन ला निश्चित झालं असलं, तरी रनडाऊन एडिटर (हा क्रम ठरवणारा) पहाटे ५:४० ला फोन मारून नसलेली बातमी "बन गई क्या" विचारून आश्चर्याची (धक्का नाही) 'ढुशी' देतो. कधीकधी अशा दोन-तीन बातम्या बोकांडी येऊन बसतात. ४० सेकंदांचाच तुकडा कापायचा असला, तरी दृश्यांचं सातत्य, कमीजास्त होणारा व्हॉल्यूम, मध्येच बंड करणारा कंप्यूटर, नसलेली दृश्यं संग्रहांमधून उचलणं, त्यांत हयात नसलेली माणसं on screen जाऊन सकाळीसकाळी प्रेक्षकांना धक्का देणार नाहीत ह्याची काळजी घेणं असले सोपस्कार पार पाडून बातमी तपासायला द्यावी लागते.
४० सेकंदांच्या बातमीत व्हीडिओ एडिटर चारशे चुका शोधणार, आणि त्या बातमीची तीन आवर्तनं उसवून पुन्हा बेतणार... म्हणजे ४० सेकंद पडद्यावर न्यायला किमान १० मिनिटांची तपस्या आणि मौल्यवान रक्त आटवणं असल्या पायर्या असतात.
त्या दिवशी अशाच 'ऐनवेळच्या' दोन बातम्या हैराण करतात. आता किंचाळी फोडून प्राण सोडायचाच पर्याय शिल्लक असतो. तितक्यात, सहाच्या शिफ़्टची एक देवदूत येऊन म्हणते, "योगेश, 'संसद में हंगामा' तुम कर लो, 'मंत्री की शादी में अश्लील नाच' मैं कर लूंगी!". एरव्ही हसून मुरकुंडी वळली असती, पण आता एक एक सेकंद सोकावलेला असतो. बैल खालमानेने जू ओढतो.
दोन दिवसांच्या सुट्टीतला पहिला दिवस शरीराच्या झोपेची घडी परत बसवण्यात जातो, तर दुसरा दिवस साप्ताहिक आवराआवरीचं सोंग वठवण्यात जातो. आता नवी शिफ़्ट,
दुपारच्या शिफ़्टमध्ये रात्रीच्या शिफ़्टइतकी धावपळ नसते. एकतर सकाळी बनलेल्या 'वरणात' पाणी घातल्या जातं, किंवा मग ताज्या बातम्या एडिट करायला पुरेसे सीनिअर एडिटर्स असतात. अशावेळी जास्त कामं म्हणजे नव्या बातम्यांचं स्क्रिप्ट लिहिणं, आणि टीवीच्या पडद्यावर जी अक्षरं जातात त्यावर लक्ष ठेवणं. खरी धांदल सुरू होते, ती प्राईमटाईम मध्ये. काम वेगळं काही नसतं, ऑफिसातली गर्दी आणि गोंधळ हे समप्रमाणात वाढलेले असतात. एकतर दोन माणसं एकच काम 'आपण एकटे' समजून करत असतात, किंवा मग 'करेल कुणितरी' म्हणून एखादं काम बेवारसही पडून राहतं!
खूप दिवसांनी रविवारचा दिवस जागेपणात जातो... राजकारण्यांपासून जनसामान्यांपर्यंत सगळेच सुट्टीच्या मूडमध्ये असतात. इतक्या उन्हाळ्यात बाहेर जाऊन उचापती कोण करणार? अशावळी 'बातमी'पदाला पोचणार्या घडामोडी ह्या सहसा मंत्र्यांच्या वातानुकूलित ऑफिसांतून-थिएटर्स किंवा तत्सम 'उच्चभ्रूऽऽऽ' परिसरांतून येतात. (नाही असं नाही. अपघात, निधनं आणि पूर्वनियोजित निदर्शनं ही उन्हाळा असला तरी 'पार पडतात'.)
त्यामुळे वीक एंड्स ना कामाची धावपळ नसते, डेस्कच्या तमाम यंत्रणेवर एकूणच गर्भार गायीचा उत्साह झळकत असतो.
पहा.... इतकं लिहूनही मी अजून एकही ठळक मुद्दा मांडला नाही... यावरून एकूणच मनस्थितीची कल्पना यावी! :)

7 comments:
mastach lihilayas re! tuzi style bhannat aani changalya arthane 'saraiit' ahe. lawkar lawkar lihi re...
"योगेश, 'संसद में हंगामा' तुम कर लो, 'मंत्री की शादी में अश्लील नाच' मैं कर लूंगी!".
हिहीही...:-D
"इतकं लिहूनही मी अजून एकही ठळक मुद्दा मांडला नाही... " हे ही पटलं. :-))
-विद्या.
tzya profession cha nusata divas vachana pan entertaining aahe...chaan....
sahi re :)
छान लिहील आहेस...बर्याच गोष्टी नव्यानेच कळल्या या व्यवसायातील.
बाकी लेख पण छान आहेत.
मला वाटतं मी औरकुट वर मी पाहिलं आहे तुम्हाला.... ह्र्दयनाथ मंगेशकरांच्या कम्युनिटीवर....
संगीतातील पण खुप जाण आहे तुम्हाला...
Keep it up.
badalalela rang-dhang aawadala! lawkar tak ki pudhchi post..
तुझं क्षेत्र वेगळं आणि खूपच गतिमान आहे.. वाचतानाही चक्रावल्यासारखं होतं! मस्त लिहितोस.. अजून डीटेल नाही का लिहू शकणार?
Post a Comment