नाईट शिफ़्ट बद्दल माझे काही पूर्वग्रह होते- जसे, आम्ही नवशिके- प्राईमटाईमच्या धावपळीत आमची लुडबुड नको म्हणून आम्हाला नाईट शिफ़्ट वगैरे. सलग दोन आठवडे रात्रपाळी दिल्याने थोडा हिरमुसलो होतो. तेव्हां एकीने ह्या शंकांचं निरसन केलं. "ऐसा क्यों सोचते हो? सवेरे दस बजे तक के सारे बुलेटिन्स और रनडाऊन्स तुम्हारे दम पर चलते हैं!", आणि "अरे वा! आपण कामाचा डॊंगर पेलू शकतो म्हणून रात्रपाळी दिलीय!" ह्या जाणिवेने मनमोराचा कस्सा पिस्सारा फुल्लला!
पण नाईट शिफ़्ट एका अर्थी मजेची वाटते. रोजची प्राईमटाईम ची धावपळ नसते- शेवटच्या लोकलला चर्चगेटवर जितपत असावं- तितपत चैतन्य असतं. कमी गोंगाट आणि तणावमुक्त चेहरे पाहिले की कामाला एका प्रकारची प्रसन्नता येते. सकाळचं बुलेटिन आणि पुढच्या तीन तासांच्या प्रक्षेपणाच्या बातम्या तयार करायला एक रात्र मस्त पुरते.
'प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतो' चा दाखला देत माझ्या पहिल्यावहिल्या रात्रपाळीचं रोस्टर आलं. ''बोहनी'च्या बुलेटिनचा एक लगाम आपल्या हाती' ह्या विचाराने, ह्या विचारानेच मशीनमधून पडणार्या पॉपकॉर्नसारखं हसू नुसतं सांडत होतं.
"रविवार रात पहुँचना" लक्षात ठेवून शनिवारी दिवसभर झोपलो... (अगदी चारी पाय हवेत करून झोपणार्या मोत्यासारखा). परीक्षेशिवाय रात्रभर जागायचं म्हणून आरशात स्वत:लाच "योगेशजी, यह बताएं, आप को कैसा लग रहा है?" विचारून घेतलं!
"आज आमची पहिली रात्र!" असं मोठ्या फुशारकीने पुष्कराजला सांगून घरून निघालो. ऑफिसला पोचून पाहतो, तर माझ्या शिफ़्टचा हजर असलेला मी एकमेव जीव! चुकून चवथ्या इयत्तेत शिरलेलं बालवाडीतलं पोर आणि चवथीतले 'सीनिअर्स' एकमेकांना ज्या नजरांनी पाहतात, तसे आम्ही एकमेकांना पाहत होतो.
मग कळलं, की आमचा साधासुधा नाही, तर अगदी हिरवागार पोपट झाला होता. 'रविवार ची नाईट' शिफ़्ट म्हणजे उजाडती मध्यरात्र नव्हे, तर मावळती मध्यरात्र! २४ तास आधी पोचलेला प्राणी पाहून त्या प्राण्यासकट सर्वांचीच करमणूक झाली! हा झाला सलामीचा दिवस.. इथून पुढे...
रात्रभर बातम्यांवर हात फिरतो, लक्ष अंधारलेल्या खिडकीतून झुंजूमुंजू होतांना पाच वाजल्याचे कळतात. ५:५९:४९ च्या आधी कामं संपवायला स्वत:ला झोकून देणं होतं... ५:५९:५० ला काउंटडाऊन सुरू होतो... ६ वाजता Channel ID ची धुन वाजते. सस्मित अँकर, "नमस्ते, मैं हूँ..." ने सुरुवात करते. घड्याळ्यापुढे पळणारं काळीज थोडं निवांत होतं. सगळं नीट असल्याची खात्री होऊन वेळ मिळाल्यास चहा घेऊन 'सकाळ' च्या साईटवर आपला माउस फिरू लागतो. पण इतका वेळ असतोच कुणाकडे? तडक सात च्या बातमीपत्राच्या हेडलाईन्स कापणं होतं. एव्हाना देशाला जाग येऊ लागलेली असते. बातम्या घडू लागतात. वार्ताहर त्या कव्हर करून लगेच दृश्यं आमच्या कडे पाठवतात. त्या प्रतिस्पर्ध्याआधी आपण झळकवाव्यात म्हणून सगळी इंद्रियं एकवटतात. पुढच्या शिफ़्टला येणारे मावळे आल्याशिवाय आपल्याला खिंड सोडता येत नाही. शेवटी सुट्टी होते. खाली कँटीनमध्ये नाश्ता होतो.
सुटकेचे काही Symptoms असतात. शाळा सुटायच्या अर्धा तास आधी शाळकरी पोर मास्तरणीचा डोळा चुकवतं... हळूहळू एक-एक पुस्तक दप्तरात जमा करतं... त्याच्या उलट, नाश्त्याच्या टेबलावर मला अचानक अनावर झोपेचा एक झटका येतो आणि लगेच प्रसन्नता तोंडावर झळकते. काकडत्या AC ऑफ़िसातून घरी पांघरुणात शिरतांना पिठाच्या ऊबदार डब्यावर चढलेल्या मांजराची तृप्ती असते. आईचा फोन येतो तेव्हां मी बोलायच्या स्थितीत नसतो आणि माझी जेव्हां 'दुपार' असते, तेव्हा सभ्य जगाला जांभया येऊ लागलेल्या असतात. माझ्या सकाळी (म्हणजे दु. ४-५) मित्र ऑनलाईन दिसतात... मग काय...
"गुड मॉर्निंग!!"
"गुड मॉर्निंग?! लेका चहा मारतोय आम्ही इथे! येतोयस का?"
"आय आय आय गंऽऽऽऽ!!!"
"जांभई आवर! मीही उशिराच जेवलोय!"
"काही विचारू नकोस. कधी दिवसपाळी, कधी रात्रपाळी... आमची पाळी अगदीच अनियमित आहे!"
"हॅ हॅ हॅ! मग? आता पुढली पाळी किती वाजताची?"
"अरे! लॉन्ग वीकएंड!! आता तीन दिवस पाळी नाही!" ,
"अरे!! उलटाच हिशोब आहे तुमचा!"
अशी ही पिशाच्चवेळ... जागलाय कधी? :)

11 comments:
चुकून चवथ्या इयत्तेत शिरलेलं बालवाडीतलं पोर आणि चवथीतले 'सीनिअर्स' एकमेकांना ज्या नजरांनी पाहतात, तसे आम्ही एकमेकांना पाहत होतो.
:)
I hope tu alyavar aajtak chya batamyanchi level jara sudharel. :D
Ekdum khuskhushit lekh ahe :)
hi..Yogesh!
tujya blogla visit denha niyamacha zalay!
kitihi vachala tari....
punha punha vachavasa vatata!
navin lekha awadala!
khup chchan ahe!
मग कळलं, की आमचा साधासुधा नाही, तर अगदी हिरवागार पोपट झाला होता. 'रविवार ची नाईट' शिफ़्ट म्हणजे उजाडती मध्यरात्र नव्हे, तर मावळती मध्यरात्र! २४ तास आधी पोचलेला प्राणी पाहून त्या प्राण्यासकट सर्वांचीच करमणूक झाली! >>
too good!!!
पण अजून कित्ती काय काय असतं की नाईट शिफ्टमधे. मधले ढकलायचे असणारे काही तास.. तेव्हाच्या बेक्कार जांभया. एखाददा रात्री बाहेर चक्कर मारून आल्यावर बाहेरचं जाणवणारं वेगळंच ताजं-तवानं विश्व - अंगात आलेलं. असली चक्कर मारून आल्यावर जी तंद्री लागते, त्यात होऊन जाणारं वेगळ्याच लेव्हलवरचं क्रिएटेव्ह काम. आणि चहा. चहा..... चहा????
तू नाही तर कोण लिहील या सगळ्यावर?
:)
wah...yogesh...chaan...
especially vegalya industry madhale anubhav vachayala chaan vatalaa....tuzyakade bharpur lihinyasarakha asel tyabaddhal....aamhi vaat baghatoy...yeude..
Now that is the best time to work in month of May. :-) Mumbaichya night shift chi athavan jhali. :-)
You write very well.Waiting to get more of Delhi. And I agree about Koham too.
mag hiravyaagaar poptaani kela kaay tyaa divashi naayanaay raatree,?
good going puDhe jaaun pustak chaapaNAar nakkee tU :-)
Changale.
Patrakaritetale ase anakhi anubhav vachayala avadel.
I am always curious about one thing:
Ekhada accident, kidnapping,murder nantar mrutachya gharachyanche je interview ghetale jatat tyachi pan adhi off screen trial vagaire ghetat ka? Many times the relatives seem more calm cool and composed than they could at such a sad time.
Sahi Boss... Ubha rahila re dolyaansamor sagala...
Sandeep
oye gr8!
Post a Comment