भिंतीवरचं हे चित्र तिरकं करून गेली.
गेल्या पावसाळ्यात ह्या भिंती कोरड्याच होत्या.
यंदा कुणास ठाऊक का,
त्यांना ओल आलीय, तडे गेलेत.
आणि तड्यांतून ओल अशी ओघळते,
जणु कोरड्या गालांवरून अश्रू.
हा पाऊस नाचत असे,
ह्याच घराच्या गच्चीवर,
बोटांनी काहीतरी गिरवून जायचा,
खिडकीच्या काचांवर.
आता गपचुप डोकावतो बापडा
हळूच, तावदानांतून.
दिवसभर किंचाळतो शुकशुकाट,
जणु उधळलेला सारीपाट...
कुणीच नाही खेळायला,
वा एखादा डाव टाकायला.
काळाचा ठोका चुकलाय,
वेळेचा ताल थबकलाय,
एव्हढा बदल घडलाय...
ती झुळूकच होती की वादळवारा
- जो ते चित्र तिरपं करून गेलाय?
(गुलज़ार च्या एका मुक्तकवितेचं स्वैर भावांतर. भाषांतर नाही)
Yogesh Raincoat la... |
4 comments:
ekdum sahi ahe re!! chhanch ahe
खूप छान आहे. मूळ कवितेच शीर्षक काय आहे?
गुलजार.....खरचं.. नाही शब्द नहि सुचतं.... अप्रतिम...
आणि तुही त्यान्च्या प्रतिमेला कुठलहि धक्का न लावता... अप्रतिम लिहलेस...भाषान्तर नाही भावन्तर केलेस....
खुपच छान....मास्तर.
Khoob farmaya... Marathi bakhoobi jaanta toh nahin, lekin padh-padh kar thoda matlab samajhta hoon. Aap Gulzar saahab kay andaaz say khaase waaqif lagte hain, Janab!!
Post a Comment