Tuesday, August 28, 2007

ताज़ा जानकारी...

१) परवां मला तीन वर्षांनी हस्तलिखित टपाल मिळालं. दर्शनाचं... दर्शना माझी बीएस्सी पासूनची वर्गमैत्रीण. ओडिसी अप्रतीम करते, अभ्यासात खणखणीत आहे. रेकॉर्ड बुक्स पूर्ण करणं असो, ग्रूप की जान च्या सगळ्या भूमिका पार पाडणं असो... दर्शना अगदी पुढे!! तिची राखी आली होती.

आम्ही सगळे मित्र पूर्वी एकमेकांना हातांनी लिहिलेली पत्रं पाठवायचो... ईमेल जुनी कल्पना झाली तरीही... मला आठवतं, मी एक लिफ़ाफ़ा भरून माझ्या पाऊण डझन मित्रांना पत्रं पाठवायचो, आणि एका लिफाफ्यातच सगळ्यांची उत्तरं यायची. मुंबईच्या चाळीचे दोन मजले धावत उतरून-चढून ती पत्रं वरती आणून धापा टाकून व्हायच्या आधीच पाकीट फोडून वाचायला सुरुवात करायचो. इतका नॉस्टॅल्जिक होतोय ना आत्ता! आमच्या निष्पाप, भोळ्या (आणि थोड्या बावळट आणि येडचॅप दिवसांचीही) आठवण ताजी होते.

२) काल नारळीपौर्णिमा. आमच्या दिल्ली मराठी गॅंग ने नारळीभाताचा बेत रचला होता. अप्रतीम जमून आला! मुख्य म्हणजे पोटभर भात बनूनही नारळाचा कीस शिल्लक होता. मग निघतांना सगळ्यांना Goodbye कीस दिला! :)

३) हिंदी डेस्कवरच्या सहकारी मित्रांचं मराठी प्रशिक्षण अगदी मजेत चाललंय, नवं शिकलेलं वाक्य, "माझम काही चुकलम असेल तर माला कडवने!" मुंबई ब्यूरोतनं कॉल केलेल्या एका-दोघांना सुखद धक्का. गरिमाला शिकवलेलं वाक्य... "तुमचम आपलम काहीतरीच!!" :)

आता गणेशोत्सवाकडे डोळे लागले आहेत. घरात दोन पुणेरी पगड्याही आहेत!! टुकटुक!!

४) "येणार... येणार... म्हणून चर्चेत असलेला ऑरकुटचा नवा लुक अखेरीस दिसू लागला. ह्याचा एकमेव फायदा हा, की निदान दोनतीन दिवस तरी "हे ऑरकुट" असं लक्षात येऊ न देता ऑफ़िसातूनही पाहता येईल!!

5 comments:

Shashank Kanade said...

[i]आता गणेशोत्सवाकडे डोळे लागले आहेत. घरात दोन पुणेरी पगड्याही आहेत!! टुकटुक!! [/i]

वाह! क्या बात है!
मी पुण्याचा, पण सध्या कानपुरास असतो.
तुमचं हे वरील वाक्य वाचून भरून आलं अगदी! :)

Meghana Bhuskute said...

४) "येणार... येणार... म्हणून चर्चेत असलेला ऑरकुटचा नवा लुक अखेरीस दिसू लागला. ह्याचा एकमेव फायदा हा, की निदान दोनतीन दिवस तरी "हे ऑरकुट" असं लक्षात येऊ न देता ऑफ़िसातूनही पाहता येईल!!


aila, he lakshatch nawhat ala ki re!!!

Tejaswini said...

hatane lihilela patr... kiti diwasat mazya pattyawar ala nahiye!!

narali-bhat mi pan try kela hyaweli.. khobara vegala ani bhat vegla.. bara lagato :D

mastch!!

zakasrao said...

yogyaa
kasaa aahes re????/
jabaraacg lihito ki tu.. :)

lekaa MB var yet jaa naayatar fatake dein :)

निनाद said...

हे सही... माझाही असा खास येडचॅप काळ मला अधून मधून आठवत असतो... खुणावतो. एकुण लिखाण आवडले!