काल माझ्या बाळाचा पहिला वाढदिवस झाला.
ती 'झाली' तेव्हां अतीशय बिकट अवस्थेत होती. जगते की मरते अशा अवस्थेत. इतक्या लहान वयात (?) रिक्षाने धडक दिल्यावर एखादं बाळ जगतं हाच चमत्कार होता. डाव्या डोळ्याचा जवळजवळ निकाल लागल्यामुळे २ महिन्यांचं ते बाळ उजवीकडून येणार्या एकमेव कवडशाकडे वळायचं. एकाच ठिकाणी गोलगोल फिरायचं. बसवेना... बसल्यावर उठवेना. मग उठताना अधू होऊन जड झालेलं डावं शरीर रेटत-रेटत दम लागे. ह्या थकव्याने उठताच घेरी येऊन परत धुपकन तिथेच आडवी. मग तिला पडल्यापडल्याच भरवणं चाले. पाऊस सोसेना म्हणून ब्लॅन्केटमध्ये गुरगुटून झोपायची. जरा धुगधुगी आली, की उजवा डोळा उघडून कण्हत कण्हत आजूबाजूला कोण आहे ते पहायची. आज्जी असल्या तर त्यांना 'ऊंऽऽऽ ऊंऽऽऽ' करून हाका मारायची.
रात्री कधीतरी अण्णा (घरमालक) थोपटून जायचे, तिचं मऊ अंग हाताखाली घेऊन तिला कधी मी 'रेकी' देत असे. रात्री एकट्याने कधी दुखणं असह्य झालं तर आवाज काढून रडे. मग खाली येऊन तिला थोपटलं की हळूहळू आवाज कमी होत होत ती गाढ झोपत असे.
हळूहळू अण्णांनी पाजलेल्या multivitamins ना, आज्जींच्या अंगार्यांना, लोकांच्या प्रेमळ थापट्यांना गुण आला, आणि बाळ आपल्या चारी पायांवर उभं रहायला धजावू लागलं!! शेपटाची, डोळ्यांची आणि उत्साहाची दिशा अजून खालचीच होती, पण आता आपल्याच शी-शूत न झोपण्याइतकी हालचाल तिला परवडत होती.
अजून नीट चालण्याचीच अडचण होती, कारण डाव्या डोळ्याने दिसत नसल्याने डावीकडच्या टेबल-खुर्च्या-कठड्यांवर पिंटी हमखास आपटायची. मग पुन्हा उजवीकडे गोलगोल फिरणं...
पण तिच्या गोडव्याची भुरळ फक्त माणसांनाच नाही, तर तिच्या 'जातवाल्यांनाही' पडायची. 'पांडोबा' गेली दहा वर्ष आमच्या घरमालकांच्या घराची इमानेइतबारे राखण करत आहेत. त्यांच्या वयाचा मुलाहिजा करावाच लागतो. भाडेकरू मुलांनी त्यांना ओलांडून जाऊ नये, वळसा घालावा, किंवा त्यांच्या उठण्याची वाट पहावी. त्याच्या थाळीत प्रत्यक्ष अण्णांनी हात घातला तरी पांडू गुरगुरून आपलं मत कळवतो!! अशा 'एव्हढ्या एव्हढ्या' पांडूच्या ताटात ते ओंजळभर पिल्लू हक्काने जिभली फिरवताना पाहून आमचं नसलेलं शेपूट पायात जात असे!
पण तो अपघाताचा लकवा हळूहळू गेला. दोन्ही डोळ्यांनी दिसू लागलं!! बोबडं भुंकणं आता गल्लीच्या टोकापर्यंत ऐकू जाऊ लागलं. नव्या आलेल्या दातांनी कुरतडण्याचा छंद पैदा केला. अशा तंद्रीत तिला हाक मारली, तर उत्तरादाखल 'औपचारिकता' म्हणून शेपूट हलवून-एखादं लहान मूल लॉलीपॉप चघळतं असल्या तन्मयतेने पुढ्यातली चप्पल कुरतडत बसायची.
अण्णांच्या घरी मांजरं पण होती. त्यामुळे पिंटी-पांडूंना मांजरांचं वावडं नव्हतं!! पिंटी अंगणात नसली, तर खुशाल समजावं, पिंटीताई आतल्या खोलीत मांजरादेखत तिच्या पिल्लांशी खेळत असाव्यात. (धर्मबुडवी फक्त माणसंच नसतात!!)
पण ६-८ महिन्यांनी एके दिवशी 'चि. पिंटी' ची 'कु. पिंटी' झाली. रात्री अवेळी भुंकणार्या 'जावयांची' गर्दी नको, म्हणून अण्णांनी पिंटीला डॉक्टरकडे नेलं, आणि 'चि.सौ.कां. पिंटी' ची पिल्लं कडेवर खेळवायची माझी इच्छा तशीच राहिली.
आज ते घर सोडल्यावर परत एकदा भेटायला गेलो होतो. "पिंटीऽऽऽ!!" अशा हाकेनंतर सोफ्याखाली काहीतरी खुडबुडलं. एक पांढरं बूड सोफ्याबाहेर आलं. तहाचं निशाण वाटावं असं पांढरं झुबकेदार शेपूट मस्त हवेत ताठ थरथरत होतं. (पिंटी आणि 'तह' एका वाक्यात येऊ देणं योग्य नव्हे!) बरोबर गुरगुरण्याचा आवाज आला.
"पिंटीऽऽऽ!! गाढव!! बाहेर ये!!" मग 'गाढव कुत्रं' बाहेर आलं. तिची पूर्ण डावी बाजू आज बरी असली, तरी डावा कान रुसूनच होता. तो एकटा टवकारलेला उजवा कान बाळकृष्णाच्या मुकुटातल्या मोरपिसासारखा दिसत होता. Birthday girl च्या दाढांत अलगद बसून त्या कुटुंबातील सगळ्यात लहान मेंबर 'म्यँव!' करत होता!! आईपणाची हौस पिंटीताई मावशीपणावर भागवत आहेत.
Happy birthday, Pinti!! आयुष्मान 'भौ'!!
कम से कम मेरे कुत्ते कमीने नहीं!!! 'कुत्रा' ही मला तरी शिवी वाटत नाही.
:)

4 comments:
योगेश, दोन्ही लेख आवडले. पिंटीचे वर्णन आणि 'भौ' झकास आहे.
yes life is more like thing than anything else. kid radiate the happiness we have miised in our burdens of life.
best luck to you and the kid tanksale drishti~cone.b;logspot.com
It's FANTASTICK!!!
mast. mazya eka animal-mover maitrinichi aathavan zali. tila lagech hi link dete vachayala [:)]
Post a Comment