Sunday, August 20, 2006

दामलेमास्तर

UNICEF आणि CYDA ने महाराष्ट्रातल्या ग्रामीण होतकरू पत्रकार मुलांसाठी एक कार्यशाळा भरवली होती... I too was a 'mentor' there. इतकं सही वाटलं न त्या मुलांना शिकवून!!

मी कुणाच्यातरी वहीत डोकावून पाहिलं... "योगेश सर म्हनतात, एकदा मराठीत सुरू केलं तर मराठीतच बोलावे. मधी इंग्रजी आनू नये, आनी इंग्रजी सुरू केलं तर मराठी शब्दांसाठी आडखळू ने!!"

पण नाही... ती पोरं खरंच हे कटाक्षाने पाळू लागलीत. नंदूरबारच्या आणि चंद्रपूरच्या काही पोरांना तर 'ळ' चा उच्चार पण येत नव्हता. मग त्यांना जीभ कशी वळवली की 'ळ' येतो, खास मराठी 'च', 'झ', 'ज' उच्चार येतात हे ते शिकवलं. अहिराणी-वर्‍हाडी संस्कारांनी घडलेल्या त्यांच्या जिभांना हे नवं खेळणं सापडलं आणि त्यांना किती बोलू असं झालं!!

मग अगदी ठसक्यात समोर येऊन, "सर, मी आता 'चु'कत नाही हे ओ'ळ'खलत का तुम्ही?" विचारलं!! मग त्यांना मी 'ळ' सारखं 'अनवट' अक्षर १४ वेळा वापरून तयार केलेल्या "घननीळा लडिवाळा" च्या ओळी वाचून दाखवल्या... उडालेच ते!!

मग spellings चं तंत्र शिकवताना...
" 'हि' कसं लिहाल?"
'H-i'...
"हं.. आता 'हि' चं 'हिप्प' करायला काय लावाल?"
H-i-p-p...
"सही!! आता आपल्याला 'हिप्प' चं 'हिप्पो' करायला काय लावावं लागेल? "
H-i-p-p-o...

असं करत करत त्यांनी त्यांच्या विक्रमी वेळात HIPPOPOTAMOUS लिहिलं. ह्याची अशी नशा चढली की मग त्यांनी स्वत:हून Inappropriate, Classification, Monosyllables, Rehabilitation वगैरे गड सर केले...

"आता आम्ही गावाला गेलो की आमच्या मित्रांना शिकवू!!". हे सगळं बसमधून फिरत असतांना, जेवत अस्ताना खेळ म्हणून घडलेली गंमत होती. उरलेला वेळ 'Inverted pyramid', 'leads', वगैरे तांत्रिक गोष्टी समजवण्यात, किंवा "बातमीचा मथळा काय होता? 'अमुक अमुक ठार.' मग तुम्ही लगेच ती बातमी आधी न देता जिल्ह्यातल्या आकडेवार्‍या कशाला द्यायच्या? जेवायला आलेल्यांना आधी वरणभात वाढायचा, की पानसुपारी करायची?" सांगत शिकवणं वगैरे झालं. तीन दिवस छान गेले.

आज निदान ३३ मुलांना तरी विश्वास आहे की त्यांच्या 'गावच्या' बोलीला कुणी हसणार नाही, कारण ते 'प्रमाण मराठी' पण शिकणार आहेत. इंग्रजी लिहायची भीति गेली आहे, आणि आता टी.वी. वर ते आजतक आणि CNN-IBN पाहून हिंदी आणि इंग्रजीचे बागुलबुवा चार पावलं मागे पळवणार आहेत.

१००% आत्मविश्वास अजून भले नसेल त्यांच्या चेहर्‍यावर. पण भीति ९०+ टक्के पळाली आहे!!!

--दामले मास्तर.

5 comments:

Anonymous said...

Neat Stuff!!

Tulip said...

इतकं छान लिहिणारा तु! ब्लॉग अपडेट करण्यात कसला रे आळशी पणा करतोस योगेश? लिहित जा तुझे हे जगावेगळे अनुभव.
al anon साठी भाषाविरहीत जाहिरात कशी करावी ह्यासाठी आम्ही ऑस्नाब्रुकजवळच्या एका छोट्या गावात दारुच्या व्यसनाने ग्रस्त पालकांच्या मुलांचा feedback घेतला तेव्हा त्यांनी केवळ पंधरा मिनिटांत एकशेतीस वेगवेगळ्या creative ideas बघता बघता नुसत्या हावभावांतून करुन दाखवल्या होत्या. कोणतेही अप्रशिक्षीत मनही एखाद्या रोजच्या त्यांच्या प्रत्यक्ष जगण्याशी संबंधीत गोष्टींबाबत प्रतिक्रिया व्यक्त करायची वेळ आली तर किती responsive आणि sensetive बनू शकते हे त्यादिवशी समजले होते. तुझा अनुभव वाचून त्यादिवशीची ती parentsच्या दारुच्या व्यसनापाई हताश आणि निराश झालेली पण तरीही कल्पकता आणि विचारांची संवेदनशीलता हरवून न बसलेली मुले आठवली.
Nice post!

Deepali said...

Too Good. Keep it up. Nice to know that somebody is taking so much of efforts to teach people in rural areas. I know the value of it as I also suffered because of non-availability of good teachers in rural areas cause my father was always got his postings in rural areas being a Electrical Engineer at Hydro Power stations.
Deepali S

archana said...

deepali shi sahamat! abhinandan aani shubhechchhaa!

yogesh said...

वरील सर्वांशी सहमत.
तुम्ही जरा जास्त लिहित जा हो :))