Monday, May 12, 2014

माकडमेवा...

दादर स्टेशन. रात्रीचे 10.
ती दिसली. भुकेली. वैतागलेली. गरीब.
टोपलीतली करवंदं विकली जात नव्हती.
लांबची लोकल पकडायची असणार...
.
विचारलं- "काय गं, कशी दिली करवंदं?"
"धा ला वाटा, सायेब!"
काळीभोर रसरशीत करवंदं खुणावत होती.
म्हटलं "दे. चार वाटे!"
.
दिव्यांच्या अंधुक उजेडात पाहिलं.
तिचे खपाटीला गेलेले डोळे विस्फारले. gasp emoticon
तिला गदगदून आलेलं असावं.
.
तिची टोपली माझ्या पिशवीत रिकामी झाली.
मी जड पावलांनी निघालो.
ती हिरकणी लेकरू कमरेला मारून उडत्या पावलांनी निघाली.
खोपोलीकडचं तिचं गाव, घरच्यांची जेवणं, पहाटे पुन्हा करवंदं तोडायची...
... तिचा दिवस संपलाच नसावा.
.
खोपोली लोकल लागली होती.
मी पहिल्या वर्गात चढलो.
ती सामानाच्या डब्यात हरवली.
.
'लेडीज़-फर्स्ट'च्या गजांपलिकडे,
दुसर्‍या चॅनलमधली मैत्रीण उभी होती.
हातातली पिशवी बघून विचारलं,
"आज बरंच काहीतरी घेतलेलं दिसतंय!"
.
मी गजांपलिकडून द्रोणभर करवंदं ऑफ़र करत म्हणालो...
"... हो! करवंदं!"
लोकलमधल्या खणखणीत उजेडात मैत्रिणीचे डोळेही विस्फारले. gasp emoticon
फेरीवालीसारखेच!!!
.
मग कळलं...
ते 'गदगदून येणं' नव्हतं.
तो 'यडा की काय!' असा अभिप्राय होता. :D :D

No comments: