Saturday, April 25, 2009

निळाई...




अमेरिकेतले माझे स्नेही मयुरेश बाजी चांगले फोटो टिपतात. तिथल्या अशाच एका गुफेतल्या तळ्याचा हा फोटो त्यांनी दाखवला. गुफेत किर्र अंधार असल्याने निळा प्रकाश कृत्रिम आहे- पण कविता करायला काय जातंय? :D

आकाश वितळले...
आणि पसरले...
फुटे निळाईस पान्हा...

घुमतो "सोऽऽहं" नाद अनाहत...
वसला येथे कान्हा?

ही झाक निळी...
की भरुनि आलेला राधेचा डोळा?

का कंठ दाटला नील झळांनी...
सांबाचा हा भोळा?

मिठीत निळ्या ह्या...
हरवू दे मज निळ्या मंडपाखाली...

गात्रं निळी...
अन् लाज निळी...
अन् निळी-निळी दे लाली!


(Shall soon replace this poem and text with a much better photofile, with the text merged in the picture.)


6 comments:

प्रशांत said...

nice :)

Sneha said...

वाहSSSS क्या बात है....

Jaswandi said...

mastch!

Dk said...

गात्रं निळी...
अन् लाज निळी...
अन् निळी-निळी दे लाली!

&
पायाला रुतती काचा
वरती फुटलेले झुंबर...

hmmm too good :):)

saurabh V said...

दामल्याऽऽऽऽऽ

मस्त कविता!

तुझी कविता, वरचा फोटो हे बघुन पु. लं.च्या "निळाई" नावाच्या धड्याची आठवण झाली. त्याबद्दल दसपट थॅंक्स! :-)

sahdeV said...

Is this what they mean when they say genre "blues"?