अमेरिकेतले माझे स्नेही मयुरेश बाजी चांगले फोटो टिपतात. तिथल्या अशाच एका गुफेतल्या तळ्याचा हा फोटो त्यांनी दाखवला. गुफेत किर्र अंधार असल्याने निळा प्रकाश कृत्रिम आहे- पण कविता करायला काय जातंय? :D
आकाश वितळले...
आणि पसरले...
फुटे निळाईस पान्हा...
घुमतो "सोऽऽहं" नाद अनाहत...
वसला येथे कान्हा?
ही झाक निळी...
की भरुनि आलेला राधेचा डोळा?
का कंठ दाटला नील झळांनी...
सांबाचा हा भोळा?
मिठीत निळ्या ह्या...
हरवू दे मज निळ्या मंडपाखाली...
गात्रं निळी...
अन् लाज निळी...
अन् निळी-निळी दे लाली!
(Shall soon replace this poem and text with a much better photofile, with the text merged in the picture.)