Wednesday, March 14, 2007

पुण्याची मैफल- नांदी ते भैरवी.

हेहे!!! हेहेहेहेहे!!! :D

(मला इतकं हसू फुटतंय की लॅब मधले लोक सुद्धा माझ्याकडे आश्चर्य-दया-कुतुहल-'पोरगा गेला रे' च्या काचेतून पाहत आहेत.)


मला स्वत:लाच हास्याच्या फुटलेल्या कारंज्याचं गुपीत कळत नाहीए! परवांपर्यंत पुणं सुटणार असूनही मी वैराग्यपूर्ण प्रतिसाद देत होतो. (एकेक दिवस असला बोर होत होता!!! शेवटचे २० दिवस ... ६ तास रडवणार्‍या सलाईन मधले शेवटचे २० थेंब रोगी ज्या नजरेने पाहतो, तसं माझं झालं होतं! माझं अस्तित्व - माझा आत्मा ओरबाडणार्‍या (उगीच वाड्गमयीन लिहीत नाही. शप्पथ- अजून सौम्य शब्द नाहीच!)

पुण्याला सोडतांना, इथल्या माणसांचे पाश तोडताना विरहाऐवजी 'सुटलो एकदाचा' हाच भाव होता.
आम्हाला गायीम्हशींसारखं पिळून पैशाच्या धारा काढणारे रिक्षावाले, वह्या आणि बनियनसुद्धा चोरणार्‍या मोलकरणी, जास्त भाड्यापोटी जुन्या भाडेकरूला एका रात्रीत बेघर करणारे घरमालक, अंगाईगीतांचा (?!) पगार घेणारे काही मास्तर पाहून, काही नात्यांवर आत्मचिंतन करवणारे प्रसंग पाहून 'पुढच्या प्रवासासाठी' आत्मा सज्ज झालाय.

पुणं आत्म्यात भिनायला वेळच मिळाला नाही. कॉलेज च्या (अन)अधिकृत वेळा आणि 'स्थानिक वेळ' ह्यांचं विळ्या-भोपळ्याचं नातं. दिवे मालवलेल्या पुण्यात आठवतो तो सिगरेटच्या धुरात कोंदलेला 'स्कॉर्पियो' चा गाभारा, आणि खानावळ ते घर केलेली शतपावली...

सिंहगड आणि हनुमान टेकडीत हरवायला बंदी नव्हती, पण इथे झालेल्या प्रेमभंगात मनाच्या टवक्यांबरोबर त्याचे पंखही गळून पडले होते. फिरायचं त्राण होतं, पण भान नाही. नट्टापट्टा-छानछोकी ह्यांची हौस मेली होती, आणि अभ्यासासाठी ते महत्वपूर्ण वाटलेही नाहीत. गज नसलेल्या एक मोठ्ठ्या पिंजर्‍यात एकटाच येरझार्‍या घालत होतो.

पण ह्या रखरखाटातही रक्ताची नसलेली नाती दाट होत गेली. सईच्या रूपात मिळालेली बहीण, ऐशच्या रूपात येऊन गेलेली एक 'झुळूक', रमण आणि ऊषाताईंसारखे 'श्रोते' - माझ्यावर भाळून मला 'मी इतकाही 'हा' नसल्याची' जाणीव करोन देणार्‍या पाऊण डझन ललना, सलोनीसारखी जीवश्चकंठश्च स्नेही, स्नेहासारखी दतककन्या, रोहन-निरंजन सारखे मित्र हे होते. बहुतेक सर्व माझ्यासारखेच 'सावत्र नागरिक'! गज नसलेल्या पिंजर्‍यात भिंती नसलेलं घर होतं.

विद्यार्थी'दशे'तले शेवटचे २० दिवस उरलेले असतांना मीठभाकरीची दिशा ठरलीही. 'पोटासाठी दाही दिशा' फिरवणार्‍या जगदीशाने आमच्यासाठी उत्तर दिशा मुक्रर केली. नवा प्रांत, पुन्हा रुजण्याकडे एक नवा प्रवास.

तिथे रिक्षावाले-मोलकरीण ह्यांना मायबोलीत रागवायची चैन नसेल, रद्दीत 'सकाळ'चे अंक पडणार नाहीत, वडापावापासून उकडीच्या मोदकांपर्यंत 'अवज्ञेला पोचलेला' एकूण एक पदार्थ आता पृथ्वीमोलाचा वाटेल!
हरकत नाही... घरापासून दूर असल्यावर दिल्ली काय, मुंबई काय, आणि पुणं काय??!! :(


पण... ज्या पुण्याला निर्लेपपणे सोडायला निघालो होतो, तिकडे आता पावलं कुणामुळे अडखळतायत? ह्या असुरांच्या जगात आताच सूर का गवसलाय? 'सोपस्कार' वाटणारी पुणे मैफलीची भैरवी अचानक इतकी सुरेल कशी झाली? ह्या भैरवीतून नवी नांदी झाली तर उत्तम, न झाली तरी, मैफिलीची भैरवी जिवंत करणार्‍या साथीदाराचा सूर कानी घुमत राहो. त्या भैरवीतल्या पसायदानाला 'तथास्तु' हे उत्तर मिळो.

अलविदा पुणे! इतकं घेतलंस, पण ह्या शेवटच्या २० दिवसांसाठी माझे केलेले १० खून तुला माफ !! :)

-Love,
Yogesh


P.S:- हेहे!!! हेहेहेहेहे!!! :D

6 comments:

Kamini Phadnis Kembhavi said...

काय सुरेख लिहीतोस रे!
वाह!

Sneha said...

:) तुझी खुपच आठवण येयील.......
तिकडे स्वतःहाची कळजी घे नक्की..

Yogesh said...

नवा प्रांत, पुन्हा रुजण्याकडे एक नवा प्रवास.

तुझ्या नवीन प्रवासाकरता ऑल द बेस्ट... आम्हाला सांगत रहा तिकडं काय चाललंय ते :)

TheKing said...

Abhinandan Damle!

Sutlaat ekda punekaranchya tavadeetoon. Btw how about gifting a few things to ur dear 1s, like gifting that molakarin personally signed brand new baniyan with sunny deol printed on it or a CD of angaaigeete to ur teacher?

Not a good idea? Ok, jau de! Tyapeksha Scorpio la ajoon ekshevatchi bhet dya.

Chinmay 'भारद्वाज' said...

good stuff. keep it up.

Radhika said...

सुरेख !